माझ्या बद्दल

देविदास देशपांडे

पत्रकार, अनुवादक व व्यंगचित्रकार

मूळ शहर नांदेड. सध्या पुण्यात वा
स्तव्य. 2001 पासून आधी उपसंपादक आणि नंतर वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत. आज का आनंद, केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया व पुणे मिरर इ. वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर सेवा. महाराष्ट्र हेराल्ड, Yahoo, Le MagIt (फ्रेंच), Rediff.com, बीबीसी हिंदी आणि लोकसत्ता.कॉम इ. संकेतस्थळासाठी लेखन. मराठी, हिंदी व इंग्रजीत नियमित ब्लॉगलेखन.

1995 पासून व्यंगचित्रे प्रकाशित. लोकपत्र, प्रजावाणी (नांदेड) यांसह सकाळ, केसरी, सकाळ अर्थमंथन व दहावी दिवाळी (केसरी) यांमध्ये मराठी व्यंगचित्रे प्रकाशित. संस्कृतमधील मोजक्या व्यंगचित्रकारांपैकी एक. ‘संभाषण संदेश’ या संस्कृत मासिकात अनेक व्यंगचित्रे प्रकाशित.

 * ‘जागतिकीकरणाची बदलती भाषा’ व ‘मनोविनोद’ ही दोन पुस्तके प्रकाशित.

 * तीन अनुवादीत पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर.

* बहुभाषिक पत्रकार म्हणून सुमारे 14 वर्षांपासून कार्यरत.

 वृत्त पोर्टफोलियो – http://devidas.contently.com/

व्यंगचित्र पोर्टफोलियो – http://devidasdesh.deviantart.com/