देवेंद्र फडणवीस पुणे सभा

भाजप जिंकला पण हरले कोण?

नगरपालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. पक्षाने अलीकडेच ज्यांची महाभरती केली, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘कल्ला केला’. आता जे निवडून आले त्यांच्यामध्ये मूळ भाजपनिवासी […]

विवेकवाद्यांच्या स्वातंत्र्याचे सोवळे

ज्येष्ठ कम्युनिस्ट लेखक आणि कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या विवेकवादी मंडळीनी परत न्यायाची आरोळी ठोकली. प्रथेप्रमाणे ओंकारेश्वरजवळील पुलावर जमून त्यांनी प्रतिगामी विचार जोर […]

कलगीतुरा चालू आहे, पुढच्या अंकासाठी सज्ज व्हा

अडीच वर्षांपासून ‘सख्खा मित्र पक्का वैरी’ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मऱ्हाटी जनतेची भरपूर करमणूक केली आहे. एवढी की, त्यामुळे राज्याच्या अन्य समस्यांची आचही जाणवेनाशी झाली आहे. हे दोघे […]

मन म्हणते काँग्रेस बरी, परिस्थिती म्हणते उपयोग नाही…!

For sweetest things turn sourest by their deeds; Lilies that fester smell far worse than weeds. (सर्वोत्तम गोष्टी स्वतःच्या कर्माने सर्वात वाईट गोष्टी बनतात. लिलीची सडलेली फुले ही तणापेक्षाही जास्त […]

सुंठीवाचून गेलेली उबळ

सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून लगोलग राजकीय आखाड्यातून व्ही. के. शशिकला यांना बाद केले आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची अस्सल काळजी गेली आहे. नव्हे, सुंठीवाचून त्यांची उबळच गेली आहे. […]

PM-Modi-n-Manmohan-Singh

रेनकोट आणि चिलखत

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालच्या पातळीवर टीका केली म्हणून सध्या गहजब केला जातोय. पंतप्रधान मोदी यांनी असे बोलायला नको होतं, असे म्हणणाऱ्यांची एक फौजच्या फौज […]

पन्नीरसेल्वम नावाचे कासव

गोष्ट जेवढी जुनी तेवढे तिचे आविष्कार वेगवेगळे. इसापने कधीतरी सांगून ठेवलेल्या ससा आणि कासवाच्या कथेची स्थिती वेगळी कशी असेल? भलेही त्यातील रूपक प्राण्यांचे असेल आणि त्या-त्या प्राण्यांना त्याची जाणीवही नसेल. […]

शिवसेना – सडण्यापासून विघटनापर्यंत

भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीच्या काळात आमची २५ वर्षे सडली, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मोठ्या तोऱ्यात म्हणाले खरे. परंतु युती तोडल्यानंतर त्यांचा पक्ष ताजातवाना झाला का? का उलट तो विघटनाकडे […]

शशिकला आणि तमिळनाडूतील मॅक्बेथ

विल्यम शेक्स्पिअरने लिहिलेल्या हॅम्लेटची जेवढी चर्चा होते, तेवढी मॅक्बेथची होत नाही. वास्तविक राजकीय महत्त्वाकांक्षा आणि त्यातून उद्भवणाऱ्या विनाशक, संहारक परिणामांचे सर्वोत्तम चित्रण यातच झाले आहे. हॅम्लेट हे संभ्रमित व्यक्तीचे प्रतीक […]

सरकार असेच चालवायचे असते!

लोकशाही राज्य प्रणालीत निर्वाचित पदाधिकारी हे श्रेष्ठ असतात आणि कार्यकारी शाखेने त्यांचे आदेश पाळायचे असतात. सत्ताधाऱ्यांचा आदेश लोकविरोधी आहे, सदसद्विवेकाला सोडून आहे किंवा मानवताविरोधी आहे, अशी संबंधित सरकारी नोकरास जाणीव झाली असेल, तर पदत्याग करून यंत्रणेच्या बाहेर पडायचे आणि अन्यायाविरोधात लढायचे, हा पर्याय त्यांना खुला असतो.