सव्वा शहाणा फडणवीस

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis“लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!”

बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा शरद पवार यांनी उच्चारलेले हे एक मार्मिक वाक्य. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यावर पवारांनी टीका केली असता “पवारांनी हा अहवाल वाचला आहे की नाही, हीच शंका आहे,” असे गोडबोले म्हणाले होते. तेव्हा पवार हे बोलले होते. वाचन, लेखन, शिक्षण किंवा एकूणच विचारांच्या क्षेत्रावर आतापर्यंत ब्राह्मणांची मक्तेदारी होती. आता ती राहिलेली नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नका, असे पवारांना म्हणायचे होते. कारण विजेचा प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा ठपका गोडबोले आयोगाने ठेवला होता. आता गोडबोले म्हणजे ब्राह्मण आणि त्यांनी आम्हाला उपदेश करू नये, हा पवारांच्या वक्तव्याचा आशय होता.

अर्थात पवार हे पुरोगामी नेते असल्यामुळे त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हे सूचकपणे सांगितले होते. मात्र जायचा तो संदेश गेला होता. “वीज क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, जी राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, ती पवार यांनी इतक्या खालच्या पातळीवर नेली आहे की यापुढे मी त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेणार नाही व भाष्यही करणार नाही. माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे. यापुढे सुजाण समाजानेच समितीच्या अहवालाबाबत मत बनवावे,” असे उद्वेगाने गोडबोले म्हणाले होते.

शिक्षण ही जशी काही काळापूर्वी ब्राह्मणांची मक्तेदारी होती, तशी राजकारण ही साखर कारखानदार, सहकार दरोडेखोर (सम्राट!) आणि पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्यांची मक्तेदारी झाली होती. ती तशी आता राहिलेली नाही, हे पवारांना सांगणारा नेता महाराष्ट्रातच निघाला आहे. बापट, देशपांडे, जोशी इ. ब्राह्मणांना आम्ही पदरी बांधू, त्यांच्यामार्फतच व्यवसाय-उद्योग चालवू पण त्यांनी आमच्या राजकारणात येऊ नये, हा पवारांचा अलिखित दंडक. त्यांच्या पुरोगामी वगैरे वगैरे गणंगांनी तो प्राणपणाने जपला होता. तो मोडला नागपूरच्या देवेंद्राने. पेशवे, फडणवीस म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांची हेटाळणी केली त्यांनीच पवारांच्या गढीला सुरुंग लावला आहे. पवारांच्याच काय, मुंबई (शिवसेना), पुणे, पिंपरी-चिंचवड (एनसीपी), सोलापूर (काँग्रेस) अशा सगळ्याच गडांना या फडणवीसाने धक्के दिले आहेत.

ऑक्टोबर २०१४ पासून म्हणजे फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून पवार यांनी येता-जाता त्यांची जात काढण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या वरदहस्ताने मोठे झालेल्या झिलकऱ्यांची त्याला साथ होतीच. तसा तो त्यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांची जात काढूनही केला होता. मात्र फडणवीस यांच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा कोण मोठा दिड शहाणा लागून गेला, अशाच आविर्भावात प्रस्थापित राजकारणी वावरत होते. म्हणून त्यांच्या कारभाराची फडणवीशी अशा शिवीवाचक शब्दांनी संभावना करण्यात आली. ज्यांच्या ऐतिहासिक उपमा संपल्या त्यांनी डोरेमॉन-शिनचान वगैरेंना हाताशी धरले. आज त्यांचे कार्टून झाले आहे.

म्हणूनच छत्रपती पेशव्यांना नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना खासदारकी देत आहेत, असा तद्दन जातवाचक उल्लेख त्यांना करावा लागला. “छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते. तर पेशवे फडणवीसांची नेमणूक करत होते. पण आता मात्र फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केली,” हे वक्ताव्य काही प्रामाणिकपणातून आलेले नाही. त्याच प्रकारे मराठा मोर्चाच्या वेळेस पवारांची भूमिका त्यांच्या स्तुतीपाठकांना वाटते तेवढी पुरोगामी खचितच नव्हती. अन् तरीही फडणवीस यांनी या सर्वावर मात करून एकहाती यश मिळवले आहे.

‘तावद् भयेषु भेतव्यं यावत् भयम् अनागतम्’. म्हणजे भीती वाटते ती गोष्ट येत नाही, तोपर्यंतच तिचे भय असते. ब्राह्मणाचे राज्य आले, तर पेशवाई परत येणार, ही भीती हेच आजपर्यंत काँग्रेस-एनसीपीचे कुरण ठरले होते. फडणवीस आल्यावर तसे काही नाही, हे जाणवल्यानंतर ती भीती सरली आणि त्यासरशी त्या भीतीवर जगणाऱ्यांची दुकानेही उठली. उलट गेल्या काही दिवसांत फडणवीसांचा विश्वास निर्देशांक हा अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा अधिकच झालेला आहे. म्हणून तर “लिहून देतो” म्हणणाऱ्या शदर पवारांवर लोक भरवसा ठेवत नाहीत. “मी शब्द देतो,” म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठेवतात. विश्वास एकदा गेला की गेला

पालिकेच्या या निवडणुकांसाठी भाजपचे केंद्रीय पातळीवरील कोणतेही नेते वा चेहरे फिरकले नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतरही. प्रचाराची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली. पायाला भिंगरी लावल्यासारखे फडणवीस हेच राज्यात फिरले. शिवसेनेचे नेते भाजपवर तुटून पडत असले, तरी फडणवीस यांच्यावर त्यांनी हात राखूनच राळ उडवली, हे मान्य करावे लागेल. मात्र काँग्रेस-एनसीपीचा सगळा भर फडणवीस यांच्यावरच होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर फडणवीस यांनाच लक्ष्य केले होते.

फडणवीसांनी अगदी हळूवारपणे आपले काम चालूच ठेवले. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना व्यवस्थित कामाला लावले. इतकेच नाही, तर निवडणुकीतल्या निकालानुसार मंत्र्यांवर कारवाई करणार, असे सांगून चुकार मंत्र्यांना इशाराही दिला. दिल्लीश्वरांचे अभय असल्यामुळे आपले कर्तृत्व दाखवायची पूर्ण संधी त्यांना मिळाली आणि ती त्यांनी 100 टक्के साधली. स्वच्छ चारित्र्य हे फडणवीस यांचे मुख्य चलनी नाणे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही तीच जमेची बाजू. पण चव्हाण यांनी स्वच्छ चारित्र्य हे निष्क्रियतेचे समानार्थी करून ठेवले होते. ती चूक फडणवीसांनी टाळली. स्वच्छ प्रतिमा हे फडणवीस यांचे बलस्थान. या दोन वर्षांच्या काळात एकही गैरव्यवहार झालेला नसल्याचा आनंद त्यांनी नुकताच व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून ते परतवून लावले. तरीही एकनाथ खडसे यांना ते वाचवू शकले नाहीत. या सर्व प्रवासात झाले एवढेच, की राज्यात सरकारचा एकमेव चेहरा बनण्यात फडणवीस यांना यश आले आहे. महापौरपद वगळता अन्य कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या एखाद्या राजकारण्यासाठी हे मोठेच यश आहे. प्रशासकीय कौशल्याबरोबरच आपल्या राजकीय बुद्धिकौशल्याने त्यांनी अनेक पेचप्रसंगावर मात केली आहे.

नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून उत्तर पेशवाईच्या काळात अर्धा शहाणा मानला जाई. काँग्रेस-एनसीपीने 15 वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात उत्तर पेशावईचीच अवस्था निर्माण केली होती. त्याला उत्तर म्हणून लढाया (निवडणुका) खेळून तो जिंकणारा फडणवीस प्रतिस्पर्ध्यांना मिळाला आहे. हा शहाणा पूर्ण शहाणाच नाही, तर सव्वा शहाणा आहे.
110 Comments

 1. जातीयवादी गळक्या बोळक्याचा चांगलाच पर्दाफाश केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

 2. लेख खूपच छान. याचप्रमाणे आरक्षण ही देखील एक कीड आपल्या समाजाला व पर्यायाने सर्व क्षेत्रात आहे. आपल्या अभ्यासपूर्ण लिखाणातून कृपया या विषयावरही लिखाण व्हावे ही विनंती.

   • आरक्षणाचा ब्राह्मणांना फायदाच झाला..परदेशात जाण्याची व नोकरीची संधी मिळाली.

    • धन्यवाद, हरीशजी. प्रतिकूलतेला संधी करण्याचा प्रकार आहे हा. त्याला फायदा म्हणता येणार नाही.
     प्रतिक्रियेबद्दल आभार.

  • परिमलजी, खूप खूप धन्यवाद. प्रतिक्रियेबद्दल आभार.
   मराठा आणि ब्राह्मण हा येथे प्रश्नच नाही. हा एकाधिकारशाहीचा प्रश्न आहे. मी माझ्या लेखात स्पष्ट म्हटले आहे, की शिक्षण हा एकेकाळी ब्राह्मणांचा एकाधिकार होता. पण आता तो नाही आणि ते योग्यच आहे.
   आपण लेख वाचून प्रतिक्रिया दिली, याबद्दल पुनश्च आभार.

 3. देविदासजी अप्रतिम आणि लोकांच्या मनावरचे जातीचे गारूड कमी होत असतानाचे टायमिंगही अचूक….

 4. खूप सडेतोड व मार्मिक लिखाण केलेत या बद्दल आपले अभिनंदन.. पुढील वाटचालीत शुभेच्छा..

 5. लेख…समर्पक आणि सुंदर आहे….
  आता थोडा आगाऊपणा….गेल्या काही दिवसांत फडणवीस यांच्या कौतुकाचे फक्त जोशी, गोडबोले, देशपांडे. कुलकर्णी यांचेच लेख येत आहेत… तथाकथित पुरोगामी मात्र आपली लेखणी फडताळात ठेवून बसलेत, असंच वाटतंय…

 6. अतिशय छान आणि अभ्यासपूर्ण लेखन… मार्मिकता व राजकारणातील बारीक सारीक अभ्यासाचे विशेष कौशल्य लेखात दिसूनआले.. देशपांडे सर.. अशाच आणखी लेखांची प्रतीक्षा… खूप साऱ्या शुभेच्छा…👌👍💐

  • धन्यवाद, सौरभ. अशा प्रतिक्रियांमुळेच लिखाणाला हुरुप येतो. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. असेच वाचत राहून प्रतिक्रिया कळवाव्यात.

 7. जसे फडणवीस यांनी जाती पातीचे राजकारण न करता काम केले आपण पण करू आणी आपण त्यांच्या पातळीवर न जाता आपलें वेगळेपण दाखवून देऊ

  • धन्यवाद, अनिशजी.

   जसे फडणवीस यांनी जाती पातीचे राजकारण न करता काम केले आपण पण करू आणी आपण त्यांच्या पातळीवर न जाता आपलें वेगळेपण दाखवून देऊ

   अगदी बरोबर.

 8. सुरेख विश्लेषण. जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या या नेत्यास जातीय आहेरांची इतकी काय गरज का पडावी? या आधी जोशी-महाजनांची सत्ता येईल अशी भीती दाखविल्यानंतरदेखील राज्यात युतीचे सरकार आले हा इतिहास विसरले की काय? पण यातून मराठी जनता परिपक्व होत आहे असे दिसते ते खरे की काय – निदान जाती-पातीच्या पलीकडे पाहून राजकीय हालचाली पाहताना तरी. हा लेख whatsapp वर forward होत माझ्या कडे आला नि प्रथमच या ब्लॉग कडे आकर्षित झालो. अशी परखड नि नीर-क्षीर विवेकी पत्रकारिताच समाजाला आधारभूत आहे अन्यथा माध्यमांचे जे काही चालले आहे ते एकूणच निराशावादी. वाळवंटातील ही हिरवळ दाखविण्यासाठी DD साहेब धन्यवाद – अशा अजून अनेक लेखांच्या प्रतीक्षेत – देवेंद्र रमेश राक्षे, रामबाग कॉलनी, कोथरूड, पुणे

  • देवेंद्रजी, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी आहे. मी म्हटल्याप्रमाणे ब्राह्मणांचे राज्य आले तर ब्राह्मणेतरांवर संकट निश्चित येईल, ही भीती दाखवूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार चालत होते. फडणवीस (किंवा भाजप) आणि त्यापूर्वी शिवसेनेचे मनोहर जोशी सत्तेवर आल्यावरही असे काही होत नाही, हा विश्वास लोकांना आला होता. त्यामुळे आपण ज्याला मतदारांचा परिपक्वपणा म्हणतो तो अनुभवसिद्ध शहाणपणा आहे. प्रत्येक गोष्टीत जातीचा विचार करणे बरोबर नाही, हे कळाले म्हणजे पुरे.
   आपल्या कौतुकमिश्रित प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

 9. निष्पक्षपातीपणे लिखाण केले असून कसलाही अभिनिवेश न ठेवता विचार केल्यास राजकीय विश्लेषण चोख असल्याचे पटेल.

 10. पुर्ण सत्य.
  जातीपातीच्या राजकारणाचा फायदा राजकारणी सोडून कोणालाच नाही हे जेव्हा सर्वसामान्याना कळेल त्याचवेळी हा देश खर्या अर्थाने विकासाच्या मार्गाला लागेल.

  • khupach chhan lekh, BJP virodhkanchi wastavta mandlit, dhanyawad. Pan ya Yashat baherun aalelya lokancha motha wata ahe he visrun chalnar nahi. Tyabaddal ekda savistar lihawe. Tarihi he yash nishchit koutukaspad ani baryach janansathi dhakkadayak ahe. Kayam sattemadhe rahnari kahi mandali ahet tyanchi gardi sadhya BJP madhe diste ahe. Sattalolupanna padanpasun dur thevle pahije, nahitar paksha badalala Pan parat tich manse padanvar distil. Aso aapnas pudhil lekhasathi shubhechha.

   • धन्यवाद, शेखरजी. भाजपच्या यशाचे सविस्तर विश्लेषण अजून व्हायचे आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे मुंबईत 82 पैकी 18 नगरसेवक तर पुण्यात 98 पैकी 13 नगरसेवक बाहेरचे आहेत.
    या संदर्भात मी मागील एका लेखात लिहिले होते. त्याची लिंक येथे आहे.
    प्रतिक्रियेबद्दल आभार.

 11. Very nice crafted article,Entire Vidharbha was in side of Devendra but now its looks like he has conquered Maharashtra.

  • धन्यवाद, रघुनाथजी. विदर्भ हा भाजपचा तसाही गड होता. मात्र यावेळचे यश हे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मिळवलेले आहे. त्यामुळे त्याला महत्त्व आहे.
   प्रतिक्रेयबद्दल अत्यंत आभारी आहे.

 12. ब्राम्हण युवक BJP कडे खुप आशेने पाहतो आहे. बेरोजगारीच्या समस्येवर काहीही होताना दिसत नाही. आर्थिक महामंडळ तरी सुरु करावे

  • हा फक्त ब्राह्मणांचा प्रश्न नाही. भाजपाला फक्त ब्राह्मणांचे काम करता येणे शक्य नाही. बेरोजगारीसाठी स्टार्ट-अप इंडियासारखे अनेक कार्यक्रम आहेत. त्यांचा फायदा घ्यावा.
   प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.

   • खरे अाहे सगल्याना बरोबर घेउन पुढे जानेच योग्य. लेख सुन्दर। वाइट याचे वाटते की शरद पवार सारखे महान नेते खालच्या पातलिवर येउन कमेन्ट करतात

 13. Pawar saheb mhatle te visru naka Fadan 20 nashibane cm zale aahet. Lihun theva 2018 Paryant tyancha ‘karyakaream’ nishit aahe.

  Deshpande aajahi lekhni ‘tumchyach hatat aahe he hya lekhavarun siddha hote’

  • प्रदेशाध्यक्षपदी असताना पक्षाला विजयी करणे आणि मुख्यमंत्री असताना यश कायम ठेवणे, यात नशीब किती आणि कर्तृत्व किती? पवारांप्रमाणे कोणाला दगाफटका करून नशिबावर मात करण्याचे धैर्य फडणवीसांनी दाखवले नाही, हे खरे.
   लेखणी आमच्या आहे तशीच ती इतरांच्याही हातात आहे. लेखातील पहिला मुद्दा हाच आहे – एकाधिकारशाही नाही आणि नको.

 14. आपण आम्हा सर्वान्च्या मनातलेच विचार तर्कशुध्दतेने मान्डले आहेत असे वाटले.अनुभूती खूपजणास येते पण अभिव्यक्तीचे सामर्थ्य आपणासारख्यान्च्यामध्येच असते.लिहीत रहा.खूप विषय असे दिसताहेत की त्याला तुमची समर्थ लेखणीच न्याय देईल.

  • धन्यवाद, नारायणजी. मीही जमेल तसे लिहायचा प्रयत्न करतो. आपल्यांसारख्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया लेखनाला हुरूप देतात.
   प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी आहे. असेच वाचत राहावे व मत कळवत राहावे.

 15. नाना फडणवीस हे लढाई लढले नसतील पण गड्याच्या ,अंगात “नाना” कला व कऴा होत़्या . लेखणीने पवारांची कत्तल केली व फडणवीसांसाठी ढाल झाली कारण पानिपत मधील अनेक मोहरा भाजपात आल्यात याचा कोठेही नाममात्र उल्लेख नाही. खेदही वाटला

  • मिलींदजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
   पानिपतमधील नाही परंतु एनसीपीतील अनेक मोहरा भाजपात आल्या आहेत. त्याचा घ्यायचा तिथे समाचार मी घेतला आहेच. आपण वाचले नसले तर आपल्या माहितीसाठी खालील लिंक देत आहे.
   http://didichyaduniyet.com/bjp-full-of-goons-for-municipal-election/
   ब्लॉग वाचूून मत कळवत राहावे.

 16. Pawar said ‘in darkness hands of a blind fell correctly on…………..’
  This time hands fell on right on joystick…(whose ?)and Phadnvis has uprooted the the same.
  Bravo ,Phadnvisji ! we are with you.Keep it with your programme of ‘Lalyukt shiwar yojna’

  • प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, इंदुरावजी.
   पवारांचे ते विधान अत्यंत खालच्या दर्जाचे होते. सुदैवाने फडणवीसांनी त्याला शाब्दिक प्रत्युत्तर न देता निवडणुकीतून उत्तर दिले.
   त्यांचे काम असेच चालू राहो, हीच इच्छा.

 17. अगदी नेमके आणि नेटके लिखाण,अभिनंदन.

 18. good article. But it can’t be forgotten that for @last 60yrs congress & communists systematically overpressed Brahmins. Reservations & certain bad tricks in admin by persons like Pawar had made the community & samaj as well, backward. In any write-up@ reservation, I have worked on it , may be of help. Feel free to call on 7875762060.
  Again congratulations for article.
  Vishwas Joshi.

 19. ब्राह्मण म्हणजे शिकलेले सवरलेले असे नाही कारण खुप ब्राह्मण असे आहेत कि त्यांना रोज जेवण कुठून मिळेल ह्याची शाश्वती नसते. त्यांना सरकार मदत करत नाही व ते सरकार मदत करेल अशी आशा पण बाळगत नाहीत. कोकणात गेल्यावर कळेल काय त्यांची अवस्था आहे ती. असे असून देखील ते कधी कोणाचा हेवा आर्त नाहीत कि त्यांचे नुकसान व्हावे असं सुद्धा चिंतीत नाहीत. ते इनामदार असतात व सरळ रस्त्याने चालतात.

  • परंतु व्यक्ती ब्राह्मण आहे म्हटल्यावर ती सुशिक्षित आहे, असे सर्वसामान्य समजले जाते. शिक्षण, वाचन व लेखन यांवर ब्राह्मणांची सत्ता होती, ही गोष्ट खरी आहे. गरिबी ही वेगळी गोष्ट आहे. गरिबीला जात-धर्म नसते.
   प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

 20. Deshpande saheb tumhi tumachya bhashet Sharad Pawaranchi ji upeksha keli ti kadachit tumachya va etar Brahman bandhu bhagininchya mate yogya asel. Pan tumhi je Paschim Maharashtratil Dhandandage, bhrasta Congress va NCP cha ullekh kelat to yogya aahe Ka? 2014 paryant sheti va shetkari kasa hota aani aaj kasa aahe yache krupaya vishleshan dya. Yacha artha asa navhe ki me Fadanvisanna kami lekhat aahe.pan sadhya ji sheti va shetkari ya vishayachi tyanchi aastha ani prayatna jara gambhir vichar karayala lavatat. Sharad Pawar, Congress, NCP bhashtra asale tari te parwadatat karan te ya gostincha gambhiryane vichar karatat. Urala prashna Brahman va bahujan vadacha tyala kararibhut asaleli hazaro varshanchi parshwabhumicha pan ullekh jarur zala pahije. Sharad Pawar yanni brahmanavishayi chukiche mat mandale ki Brahman lokanna potshul hoto pan jyaveles Tilak mhanale hote ki Kunabyachya porane sansadet javun nangar hakayacha aahe ka ? Sakali uthalya nantar telya bhutyanchi tonde pahayachi Ka ? Tevha tya tya samajatil lokkana potshul zala nahi karan te adani nirakshar hote. Sarvach Brahman vait ani sarvach marathe changale Kiva sarvach Brahman changale ani sarvach marathe vait ASE kadhi hot nahi. Aaj jar koni Brahman netyane jar ashi jaatiyavadi tippani keli tar ti sahan keli jaat nahi ulat tyacha pratikar kela jaato khilli udavali jaate karan jasa jasa samaj shikshan ghet gela samajache nirikshan karu lagala tashi tyane Brahman samajavishayi mat tayar keles. Mag marathitil ela mhani pramane ghadu lagale dali sange kidehi ragadale jata. Satat Sharad Pawaranchi jaatiyavadi, bhrasta neta mhanun nirbhatsana karane soda, tyanchya kamachihi dhakal ghyayala shika. Rajkiy mat vaiyaktik pane mandun ekadhyache vastraharan karane soda. Nahitar UP, Bhihar madhye Brahman samaj etar samajala aaj suddha ji vagnuk deto tyachehi vishleshan kara.Purogami Maharashtracha jar kahi olakh asel tar ti mhanje rajkiy netyanni tyanchya fayadyasathi jaati dharmat ted nirman karayacha prayatna karunahi sarva jaati jamati dharma va veg vegalya rajyatil lok ekatra rahatat. Nahitar etar rajye aahet jyanchya aapan vichar hi karu shakat nahi. Jar kahi chukbhul zali asel tar. Samjun ghya.

  • महेशजी, सर्वप्रथम आपले प्रतिक्रियेबद्दल आभार. आपली काहीही चूकभूल झालेली नाही. आपण मनमोकळेपणे मत व्यक्त केले आहे. त्याचा मी आदर करतो.
   सर्वप्रथम आपण म्हणता 2014 पर्यंत शेतकऱ्यांची स्थिती कशी होती? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या 2012 साली झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस-रा. काँग्रेसने त्या शेतकऱ्यांची किती दखल घेतली? 2003 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्रात तीनदा मोठा दुष्काळ आला. त्यावेळी कोण सत्ताधारी होते? त्यांनी त्यावेळी काय केले?
   मी माझ्या लेखात फक्त शरद पवारांवरच टीका केलेली नाही (उपेक्षा तर दूरच), अन्य पक्षांवरही केली आहे. शिवसेना वगळता सगळेच पक्ष (त्यात भाजपही आला) जाती-पातीला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे स्वाभाविक आहे. माझ्या दृष्टीने बाजार समितीचा एकाधिकार मोडीत काढणे आणि सहकारी संस्थांची संस्थाने खालसा करणे, हे शेतकऱ्यांसाठीचे सगळ्यात मोठे काम आहे. ते या सरकारने केले आहे. शेतकऱ्यांवरची सगळीच बंधने दूर करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, हे खरे महत्त्वाचे आहे. पण ते अजूनही दूर आहे. या सरकारला ते करावे लागेल, अन् नाही केले तर त्यांना शिक्षा द्यायला लोक आहेतच.
   राहिला मुद्दा टिळकांचा. तर टिळकांनी ते मत मांडले म्हणून ते बरोबर ठरत नाही. पण त्यानंतर आता सुमारे एक शतक उलटले आहे. टिळकांच्या वेळी मी म्हटल्याप्रमाणे बुद्धी हा ब्राह्मणांचा प्रांत मानला जात होता. पण आता ती परिस्थिती नाही. आपण आता वर्तमानात आले पाहिजे. ज्या काळात टिळकांनी वरील उद्गार काढले त्याच काळात टिळकांवर टीका करणारेही होते.
   सगळेच मराठे/ब्राह्मण चांगले किंवा वाईट असतात, असे नाही असे आपण म्हणता ते बरोबर आहे. परंतु हा प्रश्न ब्राह्मण किंवा मराठ्यांचा नाही. ठराविक क्षेत्र ही आमची मक्तेदारी आहे, ही भावना कोणातही निर्माण होऊ नये. ज्या प्रमाणे बुद्धी/शिक्षण ही आपली मालमत्ता आहे, असे ब्राह्मणांनी म्हणू नये तसेच राजकारण हा आपलाच प्रांत आहे, असेही अन्य कोणी मानू नये. इतकेच.
   उ. प्र./बिहारबाबत आपल्या निरीक्षणाशी मी सहमत आहे.
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 21. अतिशय सुंदर आणि चालू परिस्थितीला अनुकूल असा लेख लिहीला आहे. लेखकाचे हार्दीक अभिनंदन

 22. व्वा खुप छान मुद्देसूद मांडणी पवारा अंगी नाना कळा, पण आता महाराष्ट्रास लागला फडणवीसाचा लळा.

 23. सुंदर लेख डीडी. नेहमीप्रमाणेच!
  या लेखाच्या अनुषंगाने सुचलेला एक प्रश्न: “तुमच्याकडे जातीय प्रामाणिकपणा आहे का”?
  – – –
  काकाजींमधे द्वेष व मिश्किल कुसकेपणा कसा ठासून भरलाय याचे आणखी एक उदाहरण.
  हे केंद्रीय कृषीमंत्री असता महाराष्ट्राच्या भाजपाकडून कापसाच्या हमी भावावर की आणखी काहीतरी कारणाने, पण कापसासाठी टीका केली गेली.
  काकाजी कसे म्हन्तात, “ज्यांचा कापसाशी संबंध फक्त वाती वळण्यापुरता, त्यांनी गासड्यांच्या हमी भावाची चिंता कशाला करावी”?
  😂👌
  आता येतंय की समदं भाएर!

  • धन्यवाद, कौंतेय.
   छान संदर्भ दिला. पवार आणि त्यांचे बगलबच्चे काय चीज आहेत, हे जगाला माहीत आहे. इतके दिवस पुरोगामीपणाच्या झग्याखाली ते झाकले गेले. आता ते समोर येऊ लागले आहे.
   प्रतिक्रियेबद्दल आभार. असेच वाचत राहून प्रतिक्रिया येऊ द्यात.

 24. The progressive image of Sharad Pawar is only a show to the gullible people of states other than Maharaashtra but in this state he is known for his casteism especially against Brahmins although other nonmaraathaa castes have been also sailing in the same boat as exemplified by the NCP leaders of Mali caste and such other nonmarathaa castes.It is the age-old policy of the leaders who have emerged from the Congress culture,that they attempt to depict some body as a villain to whom they can blame for all the ills and as an application of this policy in Maharashtra the villain has been non-marathaa leaders especially Brahmins and an all India level it has been those villains who advocate Hindutv as the core of Indian nationalism as exemplified by RSS, BJP and the likes so as to placate the votes of minority by creating a kind of phobia against Nationalist forces.and these parties and leaders claim as the secular forces under the garb of which they implement their policy of appeasement of minorities to grab the vote bank.
  Sharad Pawar is the classical example of all the aforesaid.

 25. अतिशय सुंदर लिखाण आहे, आपल्या समाजासाठी अशा लेखनाची अत्यंत गरज आहे, असेच मनोबल वाढवणारे लिखाण चालूच ठेवावे, अभिनंदन व धन्यवाद.

 26. अत्यंत अचूक, बेधडक आणि तथाकथित पुरोगाम्यांवर योग्य प्रहार.. अभिनंदन ..

 27. Pawar sahebanchya wakyacha arth ulata asato, he aaj paryant pahat alo ahe. Mi lihun deto yacha arth tumhi pathimba kadha, mi baherun pathimba deto, ani aamachi prakarane dabun thewato. Phadanwisanahi he mahit ahe. Tyamulu te Pawaran baddal jast kahi bolat nahit. baki lekh uttam.

 28. DD, Khup sundar . . . Marmik tippanni ahe , sarwach khelat navin gadi navin rajya, he tar suruch asat, pan ya rajakaranachya khelatala ha navin gadi fadanwis, yachya kadun kharach khup aasha aahet . . geli kityek warsh rajakaranch baghat aloy, aata konitari kharya aarthane samaj karan karatoy asa aashawad watatoy . . .

  • धन्यवाद भूषण. फडणवीस यांच्या स्वरूपात राजकारणात एक नवी झुळूक आली आहे. त्यांच्याशी सामना करायचा तर जुन्या गड्यांनाही नव्या डाव(पेचांचा) विचार करावा लागेल.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा