अण्णा केजरीनिना

प्रत्येक शोकांतिकेमध्ये असेच असते. महत्त्वाकांक्षी नायक स्वतःची योजना घडवतो आणि नियती त्या योजनेला धक्का देते. पंजाब व गोवा निवडणुकांच्या निमित्ताने नियतीने केजरीवाल नामक महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या नायकाला धक्का दिला आहे. इथून पुढची वाटचाल शोकांतिकेकडे आहे – अन् त्यात अण्णा हजारेंना काहीही स्थान नाही!