सूत्रांनी दिलेल्या अफवेनुसार…

अर्थात, सोशल मीडिया हा मानवाच्या वास्तविक जीवनाचाच आविष्कार आहे. त्यामुळे माणसाच्या वास्तविक आयुष्यातील गुण-दोष तेथे प्रकटणारच. त्यामुळे भांडखोरपणा, खोटारडेपणा, शिवीगाळ या प्रत्यक्ष जीवनातील गोष्टी तिथे दिसणारच. शिवाय इंटरनेटवर व्यक्ती प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे ती कोण आहे, याचा पत्ता लागू शकत नाही. त्यामुळे हे सर्व दोष आणखी जास्त प्रमाणात प्रकट होतात. कुठलाही अभ्यास न करता मत प्रदर्शन करणाऱ्यांची येथे चलती असते. परंतु त्यामुळेच ज्यांना ‘शिंपले आणि मोती’ वेगळे करायचे आहेत, त्यांच्यावर जास्त जबाबदारी येते.

वाळू सरकली, झेंडे फडकणार!

देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी शेवटचे राहिलेले कर्नाटक हे राज्य वाचविण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू झाली आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात तेथे निवडणुका आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून सिद्दरामैया यांची एकूण कारकीर्द पाहिली, तर […]

हा आहे होय ब्राह्मणप्रतिपालकाचा इतिहास?

स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांचे अगदी नेमक्या शब्दांत वर्णन केले होते. नाही, नाही…मैद्याचे पोते नाही. ते नंतर. त्याच्याही आधी म्हणजे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून खुर्चीत बसले असताना ते […]

ही तर विनोदबुद्धीची शोकांतिका!

ज्येष्ठ व्यंगचित्रकार व विचारवंत मंगेश तेंडुलकर नुकतेच गेले. आजूबाजूला खेळकरपणाचे वातावरण कलाकलाने नष्ट होत असतानाच या सदाबहार आणि खऱ्या अर्थाने नटखट कलावंताचे जाणे समयोचितच म्हणावे लागेल. कै. तेंडुलकर यांच्यावर मी […]

महाराष्ट्राचाच लालबाग-परळ करणार?

संप म्हणजे स्वतःला काम करायचे नसेल तर स्वतः काम बंद करणे. एकेकाळी कामगार संघटना अशा संपाच्या नावाने लोकांना वेठीस धरायच्या. त्यानंतर बँक कर्मचारी व मग सरकारी कर्मचारी. मात्र आधी दत्ता […]

अण्णा केजरीनिना

प्रत्येक शोकांतिकेमध्ये असेच असते. महत्त्वाकांक्षी नायक स्वतःची योजना घडवतो आणि नियती त्या योजनेला धक्का देते. पंजाब व गोवा निवडणुकांच्या निमित्ताने नियतीने केजरीवाल नामक महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या नायकाला धक्का दिला आहे. इथून पुढची वाटचाल शोकांतिकेकडे आहे – अन् त्यात अण्णा हजारेंना काहीही स्थान नाही!

हा मोठेपणा कोणाचा? उदार कोण?

महाराष्ट्रातील एखादा पत्रकार/ब्रँडेड विचारक जातो, तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची वैयक्तिक मैत्री होती. पण बाळासाहेबांवर कठोर टीका करताना ते कधीही कचरले नाही, असे आवर्जून सांगितले जाते. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंवर […]

फुकट घाला जेऊ, तर बापल्योक येऊ

विधिमंडळाचे अधिवेशन आले की नेहमी येतो तसा शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचा बहुतेकांना कळवळा आला आहे. आज, आता, ताबडतोब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, असा धोशा बहुतेकांनी लावला आहे. आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभेत गोंधळ […]

धटासी हवे धट, उद्धवासी उद्धव

शिवसेनेची सध्याची गत कशी झाली आहे? तर वर्षभर अभ्यास करून एखादा विद्यार्थी परीक्षेत पहिला यावा आणि कॉलेजच्या गदरिंगमध्ये गाणे म्हणणारा पोरगा सगळीकडे भाव खाऊन जावा, तशी. “मुंबईत महापौर, उपमहापौर अशी […]