अम्मांच्या पोरक्यांना बाबा पावले!

साईंच्या आशिर्वादाने का होईना, ही दोन शकले एकत्र आली आहेत. जयाम्मांवरील श्रद्धा आणि राजकारणातील सबुरी या दोन वल्ह्यांवर त्यांची राजकीय नौका अलगद पार होऊ शकते.

कमल हासन राजकारण

तमिळ राजकारणातील नवा तारा?

अण्णा द्रमुकच्या महाराज्ञी जयललिता यांच्या जाण्यानंतर तमिळनाडूत भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचा चंग बांधून तिहेरी डावपेच चालू असतानाच आणखी एका खेळाडूने मुसंडी मारली आहे. बुद्धिबळाच्या […]

सुंठीवाचून गेलेली उबळ

सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून लगोलग राजकीय आखाड्यातून व्ही. के. शशिकला यांना बाद केले आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची अस्सल काळजी गेली आहे. नव्हे, सुंठीवाचून त्यांची उबळच गेली आहे. […]

पन्नीरसेल्वम नावाचे कासव

गोष्ट जेवढी जुनी तेवढे तिचे आविष्कार वेगवेगळे. इसापने कधीतरी सांगून ठेवलेल्या ससा आणि कासवाच्या कथेची स्थिती वेगळी कशी असेल? भलेही त्यातील रूपक प्राण्यांचे असेल आणि त्या-त्या प्राण्यांना त्याची जाणीवही नसेल. […]

शशिकला आणि तमिळनाडूतील मॅक्बेथ

विल्यम शेक्स्पिअरने लिहिलेल्या हॅम्लेटची जेवढी चर्चा होते, तेवढी मॅक्बेथची होत नाही. वास्तविक राजकीय महत्त्वाकांक्षा आणि त्यातून उद्भवणाऱ्या विनाशक, संहारक परिणामांचे सर्वोत्तम चित्रण यातच झाले आहे. हॅम्लेट हे संभ्रमित व्यक्तीचे प्रतीक […]

जल्लिकट्टूचे राजकारण

तमिळनाडूतील जल्लिकट्टू प्रकरणाने आता खरोखर उग्र स्वरूप धारण केले आहे. मरीना बीच निदर्शकांनी व्यापला आहे. या विषयावर झी 24 तासने आज सकाळी माझी प्रतिक्रिया घेतली. लोक उत्स्फूर्तपणे या निदर्शनांसाठी रस्त्यावर […]