कोण म्हणते मुस्लिम गाय खातात?

जे जे आपणासी ठावे, बात कुछ अलग है

फिरोझ बख्त अहमद हे ज्येष्ठ स्तंभलेखक असून ते मौलाना आझाद यांचे नातू आहेत. सध्या देशात जे गायपुराण चालू आहे त्यावर ‘पंजाब केसरी’ वृत्तपत्रात त्यांचा लेख गेल्या शनिवारी प्रसिद्ध झाला. तो जशाचा तसा मराठीत देत आहे.


13 Oct 2015

वास्तवात काहीच नाही. खरे तर गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या, की त्यांवरून मुस्लिम विद्यमान सरकार आणि संघाबद्दल आतून खूप भयभीत आहे, असे सांगितले गेले. या घटनांमधील मुख्य होती बिसहडा गावात गोमांसावरून अखलाकची हत्या, पहलू खानलाही त्याच गुन्ह्यावरून मारणे. भाजपचे काही नेते उदा. साक्षी महाराज, विनय कटियार, गिरीराज सिंह, साध्वी निरंजन ज्योति, संजीव बालियान, संगीत सोम, प्रवीण तोगडिया इत्यादी ज्या प्रकारे वेळोवेळी मुस्लिमांच्या मनाला लागेल असे चिथावणीखोर वक्तव्य देतात, हे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या मार्गात अडथळे आणत आहेत. मोदीजींनी मुसलमानांशी चांगले नाते प्रस्थापित केले आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे सौदी अरब, अफगाणिस्तान, इराण अशा अनेक मुस्लिम देशांकडून कौतुक होत आहे. त्याच वेळेस अशा वर्गाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या वर्चस्वाला बट्टा लागत आहे. वाजपेयी यांच्या प्रमाणेच मोदी हेही सर्व घटकांकडून स्वीकृत आणि चांगल्या दृष्टीने पाहिले जाणारे पंतप्रधान आहेत.

काही जण मानतात, की भाजपच्या नेत्यांकडून मुस्लिमांविरुद्ध केले जाणारे चिथावणीखोर वक्तव्य हे विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग आहेत. यानुसार मुस्लिमांना एवढे घाबरवण्यात येईल, की ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाचे नागरिक बनून राहतील. असे यासाठी शक्य नाही, की मुस्लिम जमात (कौम) अशा प्रकारच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी घाबरणारी जमात नाही. हे चिथावणीखोर वक्तव्य यासाठी करण्यात येतात, की संघ परिवारात मुस्लिमांची काही भूमिका किंवा महत्त्व नाही, असेही काही जणांना वाटते. हे कदापि बरोबर नाही कारणसाध्वी निरंजन ज्योति यांच्यासारख्या ‘रामजादे-हरामजादे’ अशा असभ्य भाषेत दिसणारे मुस्लिमांबाबतचे विचार रा. स्व. संघ कधीही बाळगत नाही. संघाच्या वतीने मुस्लिमविरोधी अजेंडा विहिप आणि मुतालिक यांच्यासारख्या लोकांकडून सदैव चालू राहील, असे काही जण मानतात. एरवी सदर लेखक संघाचे प्रवक्ते विनोद बंसल यांच्याबाबत सांगू शकतो, की त्याने जेवढ्या वेळेस त्यांची वक्तव्ये ऐकली आहेत किंवा त्यांच्यासोबत टी. व्ही.च्या चर्चेत भाग घेतला आहे, ते आपली बाजू पूर्णपणे मांडतात मात्र मुस्लिमांच्या भावनेला कधीही धक्का लावत नाहीत. हो, लेखक एवढे जरूर पुढे म्हणेल, की बंसल जसे सभ्य भाषा वापरतात तसा संयम डॉ. प्रवीण तोगडिया दाखवू शकत नाहीत. यू-ट्यूबवर त्यांचे अनेक भडक भाषणे आहेत. आता प्रश्न हा उपस्थित होतो, की मुस्लिमांनी या सर्व गोष्टींनी घाबरावे का? भारतातील मुस्लिम येथील हिंदूंएवढाच धर्मनिरपेक्ष आहे म्हणूनच आपली संस्कृती गंगा-जमुनी संस्कृती आहे, असे म्हणतात.

गोव्यात संघ परिवाराचे एक विशाल संमेलन होणार असून यात सर्व जगातून लोक येणार आहेत आणि भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी एकत्र बसणार आहेत, असे सांगून काही संस्था व लोक मुस्लिमांना घाबरवत आहेत. वस्तुस्थिती ही आहे, की भारत नेहमीच हिंदू राष्ट्र राहिला आहे. हिंदुत्व व हिंदू राष्ट्राची व्याख्याच जो सर्वांना जपून राहतो आणि सोबत घेऊन जातो, अशी आहे. तो कोणालाही त्रास देऊ शकत नाही. वसुधैव कुटुम्बकम हे त्याचे ध्येय आहे. फक्त भारतच नव्हे तर जगातील लोक शांततेने राहावेत आणि पाकिस्तानसारख्या देशांतही लोक शांततेत राहावेत, हीच त्याची खरी व्याख्या आहे. त्याच्याशी सलोख्याचे नाते राहावे मात्र अट ही आहे, की सीमेवरील गोळीबार आणि दहशतवाद्यांचे प्रकरण बंद करायला हवा.

उरला प्रश्न गाईचा तर आपल्या सनातनधर्मी बांधवांकरिता गाईचे महत्त्व खूप आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. गाईला ते मातेसमान मानतात. याचे कारण धार्मिक असण्याचे कारण हे आहे, की गाय आईप्रमाणे आपल्याला दूध देते आणि वास्तविकता हीच आहे, की भारतातच नव्हे तर विदेशातही अशा अनेक माता आहेत ज्यांच्या स्तनांत दूध नहीं येत. त्या आपल्या मुलांना काचेच्या बाटलीत गाईचे दूध पातळ करून गाईच्या दुधावर त्यांचे संगोपन करतात. अशा प्रकारे गाय आपली माताच होते.

आता प्रश्न हा आहे, की भारतातील अनेक सामाजिक घटकांत गाय खातात. भारतात ईशान्येकडील राज्य व गोवा इ. ठिकाणी लोक गाय खात असतील तर त्यांत काही मुस्लिमही समाविष्ट आहेत. गोमांस खाणारे मुस्लिमांपेक्षा गैरमुस्लिम लोक अधिक आहेत, असे गेल्या काही दिवसांच्या चर्चेतून समोर आले. हे पूर्णपणे खरे आहे कारण मुस्लिम गोमांस जवळपास खातच नाही. खरे हे आहे, की मुस्लिम वास्तवात हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा नेहमीच आदर करत आला आहे आणि गोमांसापासून दूर राहतो. बहुतांश मुस्लिम बीफऐवजी मटन किंवा चिकन खातात. ही धार्मिक रूढी असल्यामुळे नाही तर सामाजिकदृष्ट्याच असे होत आले आहे.

DL_15_mrवेद आणि पुराणांमध्ये गाय खाण्याचे उल्लेख आहेत, असा युक्तिवाद करताना गोमांस खाणारे थकत नाहीत आणि त्यावेळी सनातन धर्म सोडून जगात अन्य कोणता धर्म नव्हताच. मात्र त्याच्या आडून गोमांसभक्षणाला प्रमाणपत्र देण्याची लेखकाची सुतराम इच्छा नाही. याचा अर्थ असा, की बिरादरान-ए-वतन (हिंदू बांधव) गाईचा या पातळीपर्यंत आदर करत असतील, की तिला आईचे स्थान द्यावे तर अशा परिस्थितीत मुस्लिमांनी गाय खाऊन आपल्या बांधवांच्या भावना कदापि दुखावू नयेत. दक्षिण भारतातील केरळ राज्यात काही दिवसांपूर्वी गाईच्या वासराची कत्तल करून त्याचे मांस काही जण जनावरांप्रमाणे ज्या प्रकारे चावत होते, ती एक खूपच किळसवाणी आणि बीभत्स कृती होती. अशा जघन्य पापापासून कोणीही दूरच राहायला हवे.

जे लोक संघ परिवाराच्या आडून स्वयंभू गोरक्षक बनले आहेत, त्यांच्यावरही सरकारने अंकुश लावायला पाहिजेच पण त्यांना गजाआड पाठवावे, हेही आवश्यक आहे. त्यामुळे गाईच्या भानगडीतच न पडणाऱ्या मुस्लिमांनी गाईपासून दूर राहण्याची गरज आहे. मात्र गोमातेला (गोमैय्या) दुधासाठी पाळणाऱ्या मुस्लिमांना पोलिसांनी संरक्षण पुरवावे कारण हजरत मुहम्मद म्हणाले होते, की गाईचे दूध कृपा आहे आणि मांस हे विष आहे.

…………

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा